ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी 24 जूनला एआयसीसीचे सरचिटणीस, राज्य प्रभारी आणि पीसीसी अध्यक्षांची बैठक बोलावली आहे. ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार असून, यात पेट्रोल- डिझेलची दर वाढ तसेच महागाईविरोधात सरकारला वेठीस धरण्याच्या धोरणावर चर्चा होईल. पक्षाच्या प्रस्तावित संपर्क मोहिमांवरही यावेळी चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येते.
24 जूनच्या या बैठकीनंतर प्रदेश काँग्रेस समित्यांच्या अध्यक्षांचीही बैठक होणार आहे. जुलैमध्ये संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी ही बैठक बोलावण्यात आली आहे. पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या मुद्द्यावरून काँग्रेस गेल्या काही आठवड्यांपासून सरकारवर सतत हल्ला करत आहे.