एकाच रात्रीत चार घरफोड्या, पाच लाखांचा ऐवज लंपास
प्रतिनिधी / मिरज
मिरज तालुक्यातील सुभाषनगर आणि सोनी येथे रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला. सुभाषनगर येथे घरफोडून सुमारे दहा तोळे सोन्याचे दागिने, दोन लॅपटॉप, मोबाईल आणि सहा हजार रुपयांची रोख रक्कम असा 4 लाख, 80 हजार, 500 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
तर सोनी येथे मळा भागात एकाची ठिकाणी तीन घरे फोडून सात हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याबाबत मिरज ग्रामीण पोलिसांत नोंद झाली आहे. पोलिसांनी श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण केले. ग्रामीण पोलीस आणि स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस पथक चोरट्यांचा शोध घेत आहे. दरम्यान एकाच रात्रीत दोन गावांमध्ये चार घरफोड्या झाल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.