ऑनलाईन टीम / चंदीगढ :
बॉलिवूड अभिनेता सोनू सूदची बहिण मालविका सूद पुढील वर्षी होणारी पंजाब विधानसभेची निवडणूक लढवणार आहे. मात्र, त्या कोणत्या पक्षातून लढणार याबाबत अद्यात निश्चित झाले नाही. सोनू सूदने एका पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती दिली.
काही दिवसांपूर्वी सोनू सूदने पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांची भेट घेतली होती. त्यामुळे मालविका सूद काँग्रेसकडून निवडणूक लढणार का अशी चर्चा रंगली आहे. मालविका सूद मोगा विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे निश्चित झाले आहे. मात्र, त्या कोणत्या पक्षातून लढणार याबाबत निर्णय झाला नसल्याचे सोनू सूदने म्हटले आहे. यापूर्वी सोनू सूद आम आदमी पार्टीत प्रवेश करणार असल्याचे चर्चा होती. त्यामुळे सोनू सूद कोणत्या पक्षात प्रवेश करणार याबाबत सस्पेन्स अद्याप कायम आहे.