बेंगळूर
किया इंडियाची कॉम्पॅक्ट एसयुव्ही गटातील लोकप्रिय कार म्हणून सोनेटची गणना होत आहे. कारण या गाडीच्या विक्रीने नुकताच 1 लाखांचा टप्पा यशस्वीपणे गाठला आहे. एक वर्षापूर्वी सदरची गाडी भारतीय बाजारात दाखल झाली होती. त्यानंतर वर्षभरातच 1 लाख कार्सची विक्री होण्याचा विक्रम प्रस्थापीत करण्यात आला आहे. दक्षिण कोरीयातील कंपनीची ‘सोनेट’ ही देशात चौथ्या क्रमांकाची लोकप्रिय कार ठरली आहे.