मसाज सेंटरवरील बनावट छाप्याला दोन वर्षांनंतर कलाटणी : विदेशातील तरुणींचे पासपोर्टही घेतले होते ताब्यात
प्रतिनिधी / बेळगाव
बहुचर्चित सोने चोरीप्रकरणातील आरोपींनी हुबळी-धारवाड या जुळय़ा शहरातही गेल्या अनेक वर्षांपासून धुडगूस घातल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले असून बेळगावात जसे भामटय़ाला खऱया पोलिसांची साथ होती, तशीच साथ जुळय़ा शहरातही होती. त्यामुळे अनेक ठिकाणी छापे टाकण्यातही या प्रकरणातील आरोपी आघाडीवर असायचे. आता आणखी एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे.
हुबळीहून बेळगावला येताना पोलीस असल्याचे सांगून खोटे ओळखपत्र दाखवून हिरेबागेवाडी टोलनाका पार केल्याप्रकरणी किरण वीरनगौडर या भामटय़ावर येथील हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल झाला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी सीआयडीच्या अधिकाऱयांनी किरणला न्यायालयाची परवानगी घेऊन दहा दिवस पोलीस कोठडीत घेतले असतानाच हुबळी येथे धक्कादायक घडामोडी सुरू झाल्या आहेत. मंगळवारी येथील पाचवे जेएमएफसी न्यायालयाच्या आदेशावरून सीआयडीने किरण वीरनगौडरला ताब्यात घेतले आहे. हिरेबागेवाडी टोलनाक्मयावर पंचनामाही केला असून त्यानंतर अज्ञात ठिकाणी नेऊन किरणची चौकशी सुरू केली आहे. एकीकडे सीआयडीकडून त्याची चौकशी सुरू असतानाच हुबळीत दोन वर्षांपूर्वी घडलेला एक प्रकार समोर आला आहे.
उपलब्ध माहितीनुसार दोन वर्षांपूर्वी हुबळी येथील एका मसाज सेंटरवर पोलिसांनी छापा टाकला होता. या मसाज सेंटरमध्ये परराज्यातील व विदेशातील काही तरुणी आढळून आल्या होत्या. भामटय़ांच्या या टोळक्मयाने त्या तरुणींचे पासपोर्ट ताब्यात घेतले होते. मात्र, खऱया पोलिसांनी नव्हे तर पोलीस असल्याचे सांगत छापे टाकणाऱया भामटय़ांनी त्यांचे पासपोर्ट काढून घेतले होते.
पासपोर्ट काढून घेताना हे पासपोर्ट आपण दूतावासाला पाठविणार असल्याचे भामटय़ांनी संबंधित तरुणींना सांगितले होते. एका तरुणीने आपल्या देशाच्या दूतावासाशी संपर्क साधून हुबळी येथील ‘एसीपी’ने पाठविलेला पासपोर्ट आपल्याला परत करा, अशी विनंती केली. त्यावेळी दूतावासातील अधिकाऱयांनी आपल्याकडे कोणत्याही नागरिकाचे पासपोर्ट आलेले नाहीत, असा खुलासा करतानाच हुबळी पोलिसांना पत्र पाठवून यासंबंधी माहिती मागितली होती.
दूतावासातून पत्र आल्याची खऱया पोलीस अधिकाऱयांकडून माहिती मिळताच या भामटय़ांनी संबंधित तरुणीचा पासपोर्ट परत केला होता. त्याचवेळी काही गैरप्रकारही घडल्याची माहिती मिळाली असून बुधवारी यापैकी एक तरुणी संबंधित भामटय़ाविरुद्ध तक्रार करण्यासाठी हुबळी येथे दाखल झाली होती. त्यामुळे या प्रकरणाला आणखी कलाटणी मिळण्याची शक्मयता निर्माण झाली आहे.
सोनेरी टोळीकडून अक्षरशः लुटमारीचे प्रकार
केवळ बेळगाव, बागलकोट, हुबळी-धारवाडच नव्हे तर उत्तर कर्नाटकातील अनेक जिल्हय़ात खऱया पोलिसांच्या मदतीनेच या सोनेरी टोळीने अक्षरशः लुटमारीचे प्रकार केल्याचे उघडकीस आले आहेत. वेगवेगळय़ा प्रकरणात किरण वीरनगौडरला अटक होत असल्यामुळे त्याच्याकडून फशी पडलेले आता तक्रार देण्यासाठी पुढे येऊ लागले आहेत.