मुंबई
2020-21 वर्षात पहिल्या 11 महिन्यात (एप्रिल ते फेब्रुवारी) सोन्याच्या आयातीत 3.3 टक्के इतकी घट झाली असल्याचे दिसून आले आहे. सदरच्या कालावधीत 1.90 लाख कोटी रुपयांचे सोने आयात करण्यात आले तर मागच्या वर्षी समान कालावधीत 1.97 लाख रुपयांचे सोने आयात करण्यात आले होते. येणाऱया काळात सोन्याच्या दरात घट होण्याची शक्यता नसल्याचे सांगितले जाते. भारत हा सोने आयात करणारा जगातील सर्वाधिक मोठा देश आहे. फेब्रुवारीत सोन्याच्या आयातीत मागच्या वर्षाच्या तुलनेत वाढ झाली आहे. फेबुवारी 2021 मध्ये 38.69 हजार कोटींचे सोने आयात करण्यात आले आहे. 2020 मध्ये 1.8 लाख कोटींचे सोने विक्री झाले आहे.