कोविडचा प्रभावः पहिल्या तिमाहीतला अहवाल
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या प्रभावामुळे सोने आयातीवर आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूकीच्या बंदमुळे परिणाम झाला असून यामुळे आयात निर्यातीत अडचणी जाणवल्या आहेत. सध्या देशामध्ये सोने आयात चालू वित्त वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 94 टक्क्मयांनी घटून 5,160 कोटी रुपयांवर पोहोचली आहे, अशी माहिती वाणिज्य मंत्रालयाकडून सादर करण्यात आली आहे.
सोने आयात देशातील चालू खात्यातील तूट प्रभावित करत आहे. कोविड 19 च्या महामारीने सोन्याची मागणीही मोठय़ा प्रमाणात घसरली असून सोबत सोने आयातही खाली आली आहे. यात मागील वित्त वर्षातील तिमाहीत पिवळय़ा धातूची आयात 86,250 कोटींवर राहिली होती. यावेळी चांदी आयातही 45 टक्क्मयांनी घटून 4,300 कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे.
सोने आणि चांदी आयात कमी झाल्याने एप्रिल महिन्यात देशाच्या व्यापारात तोटा झाला असून आयात निर्यातीमधील अंतर कमी होत ते 9.12 अब्ज डॉलरवर राहिले होते. जे मागील वित्त वर्षातील समान तिमाहीत 45.96 अब्ज डॉलरवर होते.
डिसेंबरपासून घटीचा प्रवास
मागील डिसेंबर महिन्यापासून सोने आयात सलगपणे घटत आली आहे. जगाच्या तुलनेत भारत सर्वात मोठा सोने आयातक देश आहे. यामध्ये प्रामुख्याने आभूषण उद्योगासाठी सोने आयात करण्यात येते. भारत वर्षाला 800 ते 900टन सोने आयात करत आला आहे.