प्रतिनिधी/कोल्हापूर
गेल्या आठवडयामध्ये सोने-चांदीच्या दरात चढ-उतार सुरू आहे. या दोन दिवसाच्या तुलनेत सोने-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. एका दिवसात सोने 10 ग्रॅममागे 400 तर चांदी किलोमागे 600 रूपयांनी स्वस्त झाली आहे. पितृपक्ष पंधरवडा सुरू असल्याने, खरेदीसाठी सराफ बाजारात गर्दी नाही.
कोरोनामुळे सध्या विवाह सोहळे कमी आहेत.तसेच सण,उत्सवावर निर्बंध असल्याने, सराफ बाजारातील सोने-चांदीची खरेदी थंडावली आहे. त्यातच मंगळवारपासून पितृपक्ष पंधरवडा सुरू झाल्याने, नवीन खरेदी पंधरा दिवस तरी थांबली आहे. याचा फटका सराफ बाजाराला बसत असून, खरेदीही थांबली आहे.
गुरूवार व शुक्रवारच्या तुलनेत शुक्रवारी सोने चांदीच्या दरात अनुक्रमे 400 व 600 रूपयांनी स्वस्त झाली आहे. गुरूवारी सोने 47800 तर चांदी 61200 असा दर होता. शुक्रवारी हाच दर अनुक्रमे 47400 व 60600 असा होता.