नवी दिल्ली :
वायदा बाजारात आठवडय़ाच्या तिसऱया व्यापारी सत्रात बुधवारी सोने दरात चांगली घट पाहायला मिळाली. एमसीएक्सवर सकाळी सोन्याचा वायदा भावात 0.48 टक्के म्हणजे 247 रुपयांची घट होऊन प्रति 10 ग्रॅम 51 हजार 106 रुपयांवर दर होता. जागतिक स्तरावर बुधवारी सोन्याच्या वायदा किंमतीत असेच परिणाम दिसून आले. दुसरीकडे, चांदीच्या वायदा किंमतीतही घट दिसली आहे. एमसीएक्सवर चार सप्टेंबर 2020 च्या चांदीचा भाव बुधवारी सकाळी 10 वाजून 31 मिनिटांनी 0.93 टक्के म्हणजे 636 रुपयांच्या घटीसह 67 हजार 858 रुपये प्रति किलो ग्रॅमवर टेंड करत होती. जागतिक स्तरावर बुधवारी चांदीच्या वायदा किंमतीत घट दिसून आली. सप्टेंबरमध्ये चांदीच्या किंमती गेल्या महिन्याच्या तुलनेत सुमारे 10 हजार रुपये प्रतिकिलोग्रॅमपर्यंत घट दिसून आली आहे.