नवी दिल्ली / वृत्तसंस्था
मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात मोठय़ा प्रमाणात घसरण झाल्यानंतर गुरुवारी सोन्या-चांदीच्या किंमती पुन्हा वाढल्या आहेत. एमसीएक्सवरील ऑक्टोबरचा वायदा बाजाराचा दर 0.23 टक्क्मयांनी वाढून 50 हजार 940 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर चांदीचा वायदा दर 0.75 टक्क्मयांनी वाढून 68 हजार 770 रुपये प्रतिकिलो झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मौल्यवान धातूच्या किंमती कमी होत आहे. बुधवारी सोन्याचा वायदा दर दहा ग्रॅम 650 रुपयांनी घसरला. तर चांदी दर 2 हजार 650 रुपये प्रतिकिलोने उतरला होता. जागतिक बाजारपेठेतील अनिश्चिततेचा सोन्या-चांदीच्या भावावर परिणाम झाला आहे. अमेरिकन डॉलर मजबूत झाल्याने सोन्याच्या किंमतीवर दबाव आला आहे.