वृत्तसंस्था / नवी दिल्ली
राज्य सभेवर नुकतेच निवडून आलेले सर्वांनंद सोनोवाल आणि एल. मुरुगन यांनी शुक्रवारी राज्यसभेच्या सदस्यत्वाचे शपथग्रहण केले आहे. राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू यांनी त्यांना पदाची शपथ देवविली. सोनोवाल यांनी आसामी भाषेत तर मुरुगन यांनी तामिळ भाषेत शपथग्रहण केले. सोनोवाल यांच्याकडे बंदरे, जहाज वाहतूक आणि जलमार्ग खाते याआधीच सोपविण्यात आले आहे. त्याशिवाय ते आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार विभागाचे मंत्रीही आहेत. तर मुरुगन हे मत्स्य पालन, पशूपालन आणि दुग्ध व्यवसाय विभागाचे राज्यमंत्री आहेत.