ऑनलाईन टीम / मुंबई :
नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो म्हणजे एनसीबीने मुंबई विमानतळावर एक मोठी कारवाई करत महिलांना अटक करण्यात आली आहे. या महिलांकडून 50 लाखांपेक्षा अधिक किंमतीचे सोने ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, या महिलांनी काँडममध्ये सोने भरून प्रायव्हेट पार्टमध्ये सोने लपवले होते यातून तब्बल 1 किलो सोन ताब्यात घेण्यात आले आहे. या तिन ही महिला केनियाच्या नागरिक असून त्या केनियाहून कतारला गेल्या आणि त्यानंतर मुंबईला आल्या होत्या. एनसीबीने त्या तीन महिलांना कस्टम्सकडे सोपवलं आहे.
आरोपी महिलांना मुंबई विमानतळावर ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आपल्याला त्रास होत असल्याचे त्यांनी एनसीबीच्या अधिकाऱयांना सांगितले, त्यानंतर या महिलांना जे जे हॉस्पिटलमध्ये नेऊन त्यांना वैद्यकीय मदत देण्यात आली. या वेळी डॉक्टरांच्या मदतीने या महिलांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये लपवण्यात आलेल्या वस्तू काढण्यात आल्या. या महिलांकडून तब्बल 938 ग्रॅम सोने चप्त करण्यात आले आहे.