अभिनेत्री मॉडेल उर्वशी रतोला ही नेहमीच आपल्या अदांनी घायाळ करत असते. पण नुकतीच ती एका अशा ड्रेसमध्ये झळाळून गेली जो चक्क सोन्याचा होता. अरब फॅशनवीकमध्ये उर्वशीने हा तब्बल 40 कोटी रुपयांचा गाऊन घालून कॅटवॉक तर केलेच पण या फॅशनवीकमध्ये सहभागी होण्याच्या दुसऱया संधीचेही सोनं केलं. दोन वेळा या फॅशनवीकमध्ये सहभागी होणारी उर्वशी ही पहिली भारतीय कलाकार मॉडेल ठरली आहे. या सोन्याच्या ड्रेसमध्ये उर्वशी कमालीची सुंदर दिसत होती. फॅशनरॅम्पवर तिचा वॉक सुरू असतानाच तिच्या सोशलमीडियावर चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला. डिझायनर फर्ने वन अमाटो यांच्या या डिझायनर ड्रेसला उर्वशीने तिच्या सौंदर्याने चार चाँद लावत भारतीय फॅशनचा ठसा जागतिक फॅशन वीकमध्ये उमटवला. उर्वशी नुकतीच अरब सुपरस्टार मोहम्मद रमादन याच्यासोबत वर्साचे बेबी या गाण्यात थिरकताना दिसली होती.
Previous Articleजे सूर्याला दिसत नाही ते कवी पाहू शकतात
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.