ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर बस स्टँडजवळील एका पोलीस चौकीवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात दोन पोलीस जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच हल्लेखोरांच्या शोधासाठी सुरक्षा दलांकडून शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे.