ऑनलाईन टीम / मुंबई :
भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे तुम्ही सार्वजनिक केली. हे तुमचे राष्ट्रावर उपकार आहेत. तुम्ही केलेल्या तपासकार्यामुळे महाराष्ट्रातील अनेकांना तुरुंगात जावे लागले, असे पत्र शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांना पाठविले आहे.
सोमय्या यांनी हे पत्र ट्विटरवर शेअर करत राऊत यांचे आभार मानले आहेत. ”भ्रष्टाचार, शासकीय पैशांचा अपहार अशी अनेक प्रकरणे आपण सार्वजनिकरीत्या उघड केली आहेत. हे राष्ट्रावर उपकारच झाले. आपण केलेल्या तपासकार्यामुळे महाराष्ट्रातील अनेक लोकप्रतिनिधींना तुरुंगात जावे लागले. भ्रष्टाचारविरुद्धच्या आपल्या लढय़ास बळ मिळावे…….. ”असे संजय राऊत यांनी या पत्रात म्हटलं आहे. त्यावर लवकरच आपण यावर प्रतिक्रीया देऊ असे सोमय्या यांनी सांगितलं.