प्रतिनिधी/ सातारा
पालिकेचे कामकाज गुरुवारपासून बंद आहे. शुक्रवारी पालिकेत कोरोना बाधित रुग्ण आढळून येताच तेव्हा लॉक केल्यानंतर सोमवारी पालिका उघडेल असे सांगण्यात आले होते. मात्र, तशा काही सुचना कर्मचारी व अधिकाऱयांना मिळाल्या नाहीत. त्यामुळे सोमवारी पालिकेचे शटर डाऊनच होते. पालिकेचे अधिकारी ऑन फिल्ड काम करत होते तर कर्मचाऱयांकडूनही पालिकेत न येताच जबाबदारी पार पाडताना दिसत होते.
पालिकेत कोरोना बाधित रुग्ण आढळून येताच लगेच शटर डाऊन करण्यात आले. तेव्हापासून सोमवारी पालिकेचा कारभार पालिकेच्या इमारतीतून सुरु होईल असे सांगण्यात आले. परंतु पालिकेत सकाळपासून कोणीही फिरकले नाही. टाळाही कोणी उघडला नाही. बाहेरुनच आरोग्य कर्मचारी, अधिकारी काम करत होते. मुख्याधिकारी शंकर गोरे सुचना देत होते.
आज काम बंद आंदोलन
अखिल महाराष्ट्र कामगार संघाच्यावतीने पालिका कर्मचाऱयांच्या विविध मागण्यांसाठी दि. 7 रोजी काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती संघाचे चंद्रकांत खंडाईत यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. त्यांनी दिलेल्या पत्रकात पालिका कर्मचाऱयांना प्रोत्साहनपर भत्ता मिळावा, यासह विविध मागण्या आहेत.