प्रतिनिधी/ पणजी
गेल्या 24 तासात म्हणजे सोमवारी कोरोनामुळे एकाचा बळी गेला असून एकूण मृतांचा आकडा 707 झाला आहे. काल 112 नवे बाधित सापडले तर 147 जण कोरोनातून मुक्त झाले. सध्या 1030 एवढे सक्रीय कोरोना रुग्ण असून ते विविध इस्पितळात व कोविड सेंटरात उपचार घेत आहेत. संशयित रुग्ण म्हणून 26 जणांना गोमेकॉत भरती केले असून 112 जणांना होम आयसोलेशन देण्यात आले आहे. आतापर्यंत मिळून एकूण 49474 जणांना कोरोनाची बाधा झाली असून त्यातील 47737 जणांना कोरोनातून मुक्ती मिळाली आहे. गोव्यात विविध मार्गाने आलेल्या 12 प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
विविध आरोग्य केंद्रातील कोरोना रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे.
डिचोली 21, सांखळी 25, पेडणे 10, वाळपई 19, म्हापसा 19, पणजी 49, हळदोणा 36, बेतकी 13, कांदोळी 58, कासारवर्णे 13, कोलवाळ 17, खोर्ली 13, चिंबल 24, शिवोली 35, पर्वरी 76, मये 3, कुडचडे 41, काणकोण 30, मडगाव 153, वास्को 60, बाळ्ळी 29, कासावली 36, चिंचिणी 29, कुठ्ठाळी 44, कुडतरी 13, लोटली 26, मडकई 11, केपे 38, सांगे 5, शिरोडा 13, धारबांदोडा 16, फोंडा 37, नावेली 6.
एकूण कोरोना बाधितांचा आकडा आता 50,000 च्या जवळ पोहोचला असून येत्या काही दिवसात तो आकडा पार होईल अशी चिन्हे दिसत आहेत.