प्रतिनिधी/ बेळगाव
सोमवारी जिह्यातील आणखी 16 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून यामध्ये बेळगाव शहर व तालुक्मयातील 5 जणांचा समावेश आहे. प्रशासनाला आणखी 2 हजार 827 अहवालांची प्रतिक्षा आहे.
जिल्हा सर्व्हेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार एकूण बाधिकांची संख्या 25 हजार 839 इतकी झाली आहे. त्यापैकी 25 हजार 219 जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. तर जिल्ह्यातील 341 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या रुग्ण संख्येत चढउतार सुरूच आहे.
सोमवारी शिंदोळी, यमनापूर, अनगोळ, काकतीवेस, हालभांवी परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. सध्या जिह्यात 279 सक्रिय रुग्ण असून लक्षणे नसणाऱया बाधितांवर घरीच उपचार करण्यात येत आहेत. संभाव्य दुसरी लाट थोपविण्यासाठी प्रशासन व आरोग्य विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.