सर्वसामान्यांसाठीही लसीकरणाला सुरुवात
प्रतिनिधी / बेळगाव
सोमवारी बेळगाव शहर व जिह्यातील आणखी पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सर्वसामान्यांसाठी सोमवारपासून लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी केएलई संस्थेचे चेअरमन व माजी खासदार डॉ. प्रभाकर कोरे यांनी लस घेतली.
सोमवारी उचगाव, क्लब रोड, के. के. कोप्प व अथणी तालुक्मयातील शिनाळ येथे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. जिह्यातील एकूण बाधितांची संख्या 26 हजार 922 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 26 हजार 478 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
जिह्यातील 5 लाख 28 हजार 577 जणांची स्वॅब तपासणी झाली असून यापैकी 4 लाख 97 हजार 495 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अद्याप 98 सक्रिय रुग्ण आहेत. तर 20 हजार 866 हून अधिक जण 14 दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत. 1 हजार 282 जणांचे अहवाल अद्याप यायचे आहेत.
दरम्यान, केएलई इस्पितळात चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे यांनी सोमवारी कोरोनावरील लस घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, आपल्याच देशात विकसित झालेली लस पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी लस घ्यावी. यावेळी वैद्यकीय संचालक डॉ. एम. व्ही. जाली, प्राचार्या एन. एस. महंतशेट्टी, डॉ. व्ही. ए. कोठीवाले, डॉ. व्ही. एम. पट्टणशेट्टी, डॉ. राजेश पवार आदींसह अनेक डॉक्टर उपस्थित होते.