प्रतिनिधी/ बेळगाव
सोमवारी कोरोना रुग्णसंख्येत घट झाली आहे. दिवसभरात 41 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यामुळे बेळगावकरांना दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासांत बेळगाव, बैलहोंगल, चिकोडी, हुक्केरी तालुक्मयातील 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
41 बाधितांमध्ये बेळगाव तालुक्मयातील 18 जणांचा समावेश आहे. शहर व उपनगरांतील 15 व ग्रामीण भागातील तिघा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बैलहोंगल व चिकोडी तालुक्मयातील प्रत्येकी 2, बेळगाव, हुक्केरी तालुक्मयातील प्रत्येकी 1 अशा एकूण 6 जणांचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सिव्हिल हॉस्पिटलसह वेगवेगळय़ा इस्पितळांतून कोरोनामुक्त झालेल्या 186 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. एकूण बाधितांची संख्या 14 हजार 736 इतकी झाली असून यापैकी 10 हजार 423 जण कोरोनामुक्त झाले आहेत. 4 हजार 94 जणांवर वेगवेगळय़ा इस्पितळांमध्ये उपचार करण्यात येत आहे.
आणखी 1130 अहवालांची प्रतीक्षा
प्रशासनाला आणखी 1130 अहवालांची प्रतीक्षा आहे. जिल्हय़ातील 26 हजार 809 जण अद्याप होमकेअरमध्ये आहेत. कोरोनामुळे आजपर्यंत एकूण मृतांचा सरकारी आकडा 219 वर पोहोचला आहे. उपलब्ध माहितीनुसार रविवारी प्रयोग शाळा बंद होत्या. त्यामुळे तपासणी कमी झाल्या आहेत. म्हणून रुग्णसंख्या घटली आहे.
मुतगा, शिंदोळी, कर्ले, कुलकर्णी गल्ली, महाद्वार रोड, टि. व्ही. सेंटर, शिवबसवनगर, महांतेशनगर, न्यू गुड्सशेड रोड, श्रीनगर, हनुमाननगर, अनगोळ परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. हुक्केरी, अथणी, चिकोडी, खानापूर, गोकाक, सौंदत्ती, तालुक्मयातही सोमवारी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
148 कोरोनाबाधितांची प्रसुती
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 148 कोरोनाबाधित महिलांची प्रसुती झाली आहे. यामध्ये 72 सिजेरियन झाली असून 76 नॉर्मल डिलेव्हरी झाल्या आहेत. सर्व अर्भकांचे अहवाल मात्र निगेटिव्ह आले आहेत.