पश्चिम व उत्तर भागातील गावांत होणार व्यत्यय
प्रतिनिधी/ बेळगाव
स्मार्टसिटी योजनेंतर्गत सुरू असलेली रस्त्याची कामे व वीज मार्गांचे स्थलांतरणाच्या पार्श्वभूमिवर सोमवारी बेळगाव तालुक्मयातील उत्तर व पश्चिम भागातील काही गावांत वीज पुरवठा खंडीत राहणार आहे.
हेस्कॉमच्या कार्यकारी अभियंत्यांनी शुक्रवारी एका पत्रकाक्दारे ही माहिती दिली आहे. सोमवार दि. 14 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5.30 यावेळेत 33 केव्ही सदाशिवनगर उपकेंद्रातून वितरित होणारे कंग्राळी खुर्द अलतगा गावांना वीज पुरवठा खंडीत करण्यात येणार आहे.
हेस्कॉमच्यावतीने काही तातडीची कामे राबविण्यात येणार असल्यामुळे सकाळी 10 ते दुपारी 4 यावेळेत 110 केव्ही उचगाव उपकेंद्रातून पुरवठा होणाऱया कल्लेहोळ, उचगाव, बसुर्ते, बेकिनकेरे, सुळगा (हिं), तुरमुरी, कोनेवाडी व बाची परिसरात वीज पुरवठा खंडीत होणार आहे. ग्राहकांनी याची याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.