मंगळवारी कमी दाबाने पुरवठा : ए, बी, ई वॉर्डातील नागरिकांना पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन
प्रतिनिधी / कोल्हापूर
महापारेषण महावितरण कंपनीकडून पुईखडी सबस्टेशनमधील तातडीच्या दुरुस्ती कामाकरीता पुईखडी, जुने व नवीन आपटेनगर पंपींग स्टेशनकडील विद्युत पुरवठा बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे सोमवार 26 ऑक्टोंबर रोजी शहरातील संपूर्ण ए, बी, ई वॉर्ड व त्यास सलग्नग्नित उपनगरे व ग्रामीण भागातील नळ कनेक्शन धारकांना पाणी पुरवठा होऊ शकणार नाही. त्याचप्रमाणे मंगळवार 27 ऑक्टोबर रोजी होणारा पाणी पुरवठा अपुरा व कमी दाबाने होणार आहे. या काळात पाणी काटकसरीने वापरून सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
या भागात राहणार सोमवारी पाणी पुरवठा बंद
ए,बी व ई वॉर्डमधील साळोखे नगर, सुर्वे नगर, महाराष्ट्र नगर, देवकर पाणंद, राजलक्ष्मीनगर, दत्त कॉलनी, मनाली हौसिंग सोसायटी, वसंत विश्वास पार्क, तात्यासो मोहिते कॉलनी, यशवंत पार्क, सानेगुरूजी वसाहत, आपटेनगर टाकी परिसर, राजोपाध्येनगर, कणेरकरनगर, क्रातीसिंहनाना पाटील नगर, तुळजाभवानी कॉलनी परिसर, देवकर पाणंद, शिवाजी पेठ परिसर, मंगळवार पेठ, हनुमान नगर, रायगड कॉलनी, आयसोलेशन हॉस्पिटल, संभाजीनगर, खासबाग मैदान, आर.के.नगर, साळोखेनगर, संभाजीनगर, सुधाकर जोशी नगर, नाळे कॉलनी, मोरे कॉलनी, हनुमाननगर, रायगड कॉलनी, गजानन महाराज नगर, एनसीसी ऑफीस, जरगनगर ले आऊट नंबर 1 ते 4, बागल चौक, राजारामपुरी,सम्राटनगर, प्रतिभा नगर, वायपी पोवार नगर, पांझरपोळ, दौलत नगर, विक्रमनगर, लोणार वसाहत, लिशा हॉटेल, रुईकर कॉलनी, महाडीक माळ, शिवाजीपार्क व उपनगरे.
महापालिकेकडून टँकरचे नियोजन सोमवार आणि मंगळवारी नागरीकांना दैनंदिन पिण्याच्या पाण्याची सोय होण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेकडील उपलब्ध टँकर व्दारे पाणी वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. तरी या भागातील नागरीकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून सहकार्य करावे असे आवाहन महानगरपालिकेच्या