मृतांमध्ये 8 महिला, सक्रिय रुग्णसंख्येत घट
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोनाबाधितांची संख्या कमी होत चालली आहे. सोमवारी 355 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून 1219 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर गेल्या 24 तासांमध्ये 8 महिलांसह एकूण 15 जणांचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार एकूण बाधितांचा आकडा 71 हजार 33 वर पोहोचला आहे तर आतापर्यंत 60 हजार 777 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सोमवारी सक्रिय रुग्ण संख्याही घटली आहे. ही संख्या 9 हजार 605 वर येवून ठेपली आहे. आतापर्यंतचा मृतांचा आकडा 651 इतका झाला आहे. बेळगाव, चिकोडी तालुक्मयातील प्रत्येकी सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सोमवारी दगावलेल्या 15 जणांपैकी 8 जणांचा मृत्यू सिव्हिल हॉस्पिटलमध्ये झाला आहे. गोकाक, खानापूर, रायबाग तालुक्मयातही प्रत्येकी एकाचा कोरोनामुळे बळी गेला आहे. संपूर्ण जिल्हय़ात बेळगाव, चिकोडी व अथणी तालुक्मयात सध्या रुग्णसंख्या अधिक आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार अद्याप 65 हजार 777 जण 14 दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत. सोमवारी मरनहोळ, अंकलगी, हुंचेनट्टी, कल्लेहोळ, कंग्राळी खुर्द, खादरवाडी, कट्टणभावी, सुळेभावी, विजयनगर, बहाद्दरवाडी, हिंदवाडी, भाग्यनगर, भारतनगर-वडगाव, भवानीनगर, कॅम्प, बॉक्साईट रोड, बिम्स क्वॉर्टर्स, वैभवनगर, टिळकवाडी, गणेशपूर परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
हनुमाननगर, हुलबत्ते कॉलनी, लक्ष्मीनगर-वडगाव, माळी गल्ली, चिदंबरनगर, रामतीर्थनगर, टिळकवाडी, महांतेशनगर, सदाशिवनगर, वैभवनगर, शाहूनगर, शास्त्राrनगर, रिसालदार गल्ली परिसरातही नवे रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या चार दिवसांत रुग्णसंख्येत घट होत असल्यामुळे सरकारी व खासगी इस्पितळांवरील ताण कमी झाला आहे.
32 वाहने जप्त, विनामास्क फिरणाऱयांवर कारवाई
लॉकडाऊनच्या काळात अनावश्यकपणे फिरणारी 32 वाहने सोमवारी पोलिसांनी जप्त केली आहेत. तर विनामास्क फिरणाऱया 278 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी ही माहिती दिली आहे.