प्रतिनिधी/ पणजी
राज्यात काल सोमवारी 125 जण कोरोनामुक्त झाले तर 52 नवीन कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 1061 झाली असून एकूण कोरोना बाधितांची संख्या 1813 झाली आहे. सक्रिय रुग्ण 745 आहेत. माजी आरोग्यमंत्री तसेच गोवा प्रदेश भाजपचे माजी अध्यक्ष डॉ. सुरेश कुसो आमोणकर यांचे कोरोनामुळे सोमवारी रात्री निधन झाले. कोरोनाचा हा राज्यातील आठवा बळी ठरला आहे.
गोव्यात विविध मार्गाने येणारे प्रवासी हे कोरोना पॉझिटिव्ह मिळत असून विविध मार्गाने आलेल्या 113 जणांचा सक्रिय रुग्णांमध्ये समावेश आहे. सोमवारी 1606 जणांचे नमुणे तपासण्यात आले. त्यातील 1188 जणांचे अहवाल निगेटिव्ह मिळाले तर 52 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत. उर्वरित 366 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.
विविध हॉटेल्स, रेसिडेन्सीमध्ये क्वारंटाईन करून ठेवलेल्यांची संख्या 122 असून 125 देशी प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. 71 प्रवासी पॅसिलिटी क्वारंटाईनमध्ये आहेत. झुवारीनगरातील कोरोनाबाधितांची संख्या 98 झाली आहे. चिंबलमध्ये कोरोनाचे रुग्ण 52 झाले आहेत. सडा – 70, बायणा – 72, कुडतरी – 31, न्युवाडे – 60, मार्ले – 22, खारीवाडा – 31, बाळ्ळी – 23 असे कोरोना रुग्णांचे एकंदरीत चित्र आहे.
मांगोरहिल – 99, मांगोरहिल संबंधित – 238, कुडतरी – 10, मडगाव – 22, आंबेलीशी संबंधित – 14, केपे – 12, लोटली – 5, नावेली – 2, गंगानगर, म्हापसा – 7, सांखळी – 43, कामराभाट – 7, काणकोण – 6, फातोर्डा – 2, पर्वरी – 4, राय – 2, वेर्णा -9, फोंडा – 23, वाळपई – 10, माशेल – 5, उसगाव – 6, डिचोली – 9, शिरोडा – 7, पेडणे – 8, दिवाडी – 3, गोवा वेल्हा – 5, बेतकी – 2, सांगे – 3, कुठ्ठाळी – 6, कुंकळी – 5, मंडुर – 4, धारबांदोडा – 10, ताळगाव – 1, शंकरवाडी – 4 अशा विविध ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे. पीर्ण, नुवे, आगाशी, करंझाळे, म्हार्दोळ, माजोर्डा, थिवी, कुडचडे, खोर्ली-म्हापसा या ठिकाणी प्रत्येकी एक कोरोना पॉझिटिव्ह सापडला आहे.