प्रतिनिधी / बेळगाव
सोमवारी बेळगाव जिल्हय़ात 169 नवे रुग्ण आढळून आले. तर 769 जणांनी कोरोनावर मात केली असून गेल्या 24 तासात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. सक्रिय रुग्णसंख्येतही घट झाली असून त्यामुळे इस्पितळांवरील ताण कमी झाला आहे.
जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 73 हजार 592 वर पोहोचली आहे तर आतापर्यंत 67,668 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सोमवारी सायंकाळी आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार अद्याप 5,220 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर वेगवेगळी इस्पितळे व कोविड केअर सेंटरमध्ये उपचार करण्यात येत आहेत.
गेल्या 24 तासात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हय़ातील मृतांचा आकडा 704 वर पोहोचला आहे. सोमवारी बेळगाव तालुक्मयातील दोन महिला, हुक्केरी तालुक्मयातील एक महिला, रामदुर्ग तालुक्मयातील एक महिला व खानापूर तालुक्मयातील एका इसमाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
सौंदत्ती, रामदुर्ग, हुक्केरी, गोकाक, बैलहोंगल तालुक्मयात रुग्णसंख्या कमी झाल्याचे आढळून आले आहे. अथणी, बेळगाव, चिकोडी, रायबाग तालुक्मयात मात्र बाधितांची संख्या वाढतच आहे. अद्याप 1 हजार 194 जणांचे अहवाल यायचे आहेत. तर 57 हजार 691 जण 14 दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत.
बाळेकुंद्री, तुरमुरी, मच्छे, हिरेबागेवाडी, बाची, हिंडलगा, खादरवाडी, मुतगा, कडोली, येळळूर, सावगाव, सुळगा, मारिहाळ, शहापूर, अनगोळ, अंजनेयनगर, आझादनगर, अन्नपूर्णावाडी, बसवनकुडची, भाग्यनगर, भारतनगर-शहापूर, गणेशनगर, पार्वतीनगर, हनुमाननगर, इंदिरानगर, कणबर्गी, महांतेशनगर, टिळकवाडी, सैनिकनगर, रामतीर्थनगर, सह्याद्रीनगर, हिंदवाडी, लक्ष्मी टेकडी, शाहूनगर, शिवबसवनगर, उज्ज्वलनगर, वडगाव परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
222 जणांवर कारवाई
लॉकडाऊनचे नियम मोडून विनामास्क फिरणाऱया 222 जणांवर बेळगाव शहर व उपनगरांमध्ये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे तर 38 वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी ही माहिती दिली आहे.