ऑनलाईन टीम / सिमला
हिमाचल प्रदेशच्या सोलन जिल्ह्यात एकाच वेळी पाच नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. नालागढ मधील मानपुरा क्वारंनटाइन सेंटरमध्ये हे पाच रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 10 एप्रिल नंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण आढळले आहेत. हिमाचल प्रदेशात आतापर्यंत 115 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये ॲक्टिव रुग्णांची संख्या 60 आहे. तर 56 जणांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. हिमाचलमध्ये बुधवारी 18 जण पॉझिटिव्ह आढळले. यामधील 13 जण एकट्या कांगडा जिल्ह्यातील होते. चार जण मंडी मधील तर एक जण कल्लु जिल्ह्यातील होता.
दरम्यान, आज आढळलेल्या 5 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.