तरुण भारत संवाद प्रतिनिधी/बार्शी
कोरोना विषाणूचा संसर्ग आता सामान्य माणसाच्या उंबरठ्यावर आला असताना आज सकाळी एक बातमी बार्शीत येऊन धडकली की सोलापूर येथील एक उच्चपदस्थ अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे. या बातमीने आज तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कारण सोलापुरातील हे उच्चपदस्थ अधिकारी अगदी सहा दिवसापूर्वी बार्शी मध्ये येऊन त्यांनी अनेक ठिकाणी भेटी दिल्या होत्या. तर काही अन्नछत्रामध्ये ही त्यांनी बराच वेळ घालवला होता आणि जेवणही केले होते. या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या बार्शी दौर याप्रसंगी उपस्थित असणारे अधिकारी वर्ग सामाजिक कार्यकर्ते, संचालक आणि इतर लोकांच्या तणावात भर पडली असून ही बातमी वाऱ्यासारखी बार्शीत पसरली आणि एकच चर्चा सर्व बार्शी मध्ये पाहायला मिळाली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, 7 मे रोजी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील एक वरिष्ठ अधिकारी बार्शी येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी बार्शीतील विविध अधिकारी यांची भेट घेऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर काही राजकीय मंडळी यांच्याशी चर्चा केली व नंतर काही सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार यांना सोबत घेऊन बार्शी येथे चालू असलेल्या विविध अन्नछत्र भेट दिली. त्यांनी या दौऱ्यात एका अन्न छत्रा मध्ये दुपारचे भोजन घेतले होते. आज सकाळी त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची बातमी बार्शीत धडकली आणि याप्रसंगी असणारे अनेक मंडळी यांच्या मनात खदखद व्हायला लागले.
तर येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी व इतर मंडळी यांनी आज पासून लगेच आपल्या घरात स्वतःला अलगीकरण करून घेतले आता महत्वाचा प्रश्न हा आहे की या उच्चपदस्थ अधिकारी यांना आजची झालेली लागण बार्शी मध्ये येण्यापूर्वी झाली की बार्शीतून निघून गेल्यानंतर हे तपासणे महत्त्वाचे आहे. मात्र आज बार्शीतील बऱ्याच मुंडे यांनी स्वतःला आपल्या घरात अलगीकरण करून घेतले आहे आता प्रशासनाने सोलापूर शहरातील कोणताही अधिकारी बार्शीत पाठवू नये किंवा बार्शीतील कोणताही अधिकारी सोलापुरात बोलवु नये अशी मागणी काही जाणकार मंडळींनी केली आहे.