तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापुर
सोलापुरात पाच्छा पेठ परिसरात दोन कोरोना बाधित रुग्ण आढळले होते. त्यापैकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली होती. तिच्यावर सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्या महिलेच्या संपर्कात आलेल्यांपैकी एकूण 22व्यक्तींचे थुंकीचे नमुने घेण्यात आले आहेत. त्याचा अहवाल उद्या गुरुवारी येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी बुधवारी दिली.
सोलापुरातील पाच्छा पेठ येथील एक व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आली होती. जिल्हा प्रशासनास माहिती मिळताच त्या भागात सर्वेक्षण करण्यात आले. त्या मृत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या 148 पैकी 124 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या 103 व्यक्तींना होम क्वारंटाईन मध्ये ठेवण्यात आले आहे. एका महिलाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून तिच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. त्या महिलेच्या संपर्कात एकूण 22 व्यक्ती आले असून त्यांना आयसोलेशन वार्डात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या थुंकीचे नमुने घेण्यात आले आहेत. या सर्वांचा अहवाल गुरुवारी येईल असेही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले. एकंदरीत बुधवारी सोलापुरात कोरोनाबाधित रुग्णांत वाढ झाली नाही.
जिल्ह्यात
होम क्वारंटाईन –
1 हजार 217
व्यक्ती
473
व्यक्तीचा
– 14 दिवसाचा
कालावधी संपला
होम
क्वारंटाईन –
474व्यक्ती
आयसोलेशन
वार्ड – 448
जण
निगेटिव्ह
रिपोर्ट –
401
प्रलंबित
रिपोर्ट –
47
इन्स्टिटय़ूशनल
– 693 – 222 जणांचा
कालावधी संपला
इनिस्टटय़ूशनल
क्वारटाईनमध्ये –
471
सोलापूर
जिल्ह्यात कोरोना बाधीत संख्या
– 2 , मृत्यू
– 1