तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापुरातील कोरोना बाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या बावीस व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 12 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर उर्वरित नऊ जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. एक व्यक्तीचा रिपोर्ट प्रलंबित आहे. दुपारी ज्या 10 व्यक्तींचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्या संपर्कात 49 व्यक्ती आल्या आहेत. या सर्वांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्याचा अहवाल प्रतीक्षेत असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज गुरुवारी दिली.
आत्तापर्यंत सोलापुरात कोरोना बाधित संशयित 474 जणांचे स्वॅब शासकीय रुग्णालयात चाचणीसाठी घेण्यात आले होते. आतापर्यंत यापैकी 460 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. यात 448 जणांचे अहवाल निगेटिव्ह असून 12 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. अद्यापही 14 जणांचे अहवाल येणे अपेक्षित आहे.
पॉझिटिव्ह 12 पैकी 11 जणांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. एका रुग्णाचा आधीच मृत्यू झाला आहे. पाच्छा पेठेत मृत पावलेल्या कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील 148 जणांचे कोरोना चाचणी अहवाल साठी स्वॅब घेण्यात आले होते. यातील सर्व 148 अहवाल प्राप्त झाले आहेत. 146 निगेटिव्ह तर 2 पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत.
या दोन पैकी खाजगी हॉस्पिटल मधील एक महिला सेविका होती. त्यानंतर या महिलेच्या संपर्कातील 22 जणांचे स्वॅब घेण्यात आले यातील 12 जणांचे निगेटिव्ह तर 9 जणांचे पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. अद्यापही एका व्यक्तीचा अहवाल पेंडिंग आहे. त्या पॉझिटिव्ह व्यक्तींपासून 49 जण संपर्कात आले आहेत. त्यांना ताब्यात घेऊन सिव्हिल रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती शंभरकर यांनी दिली. पाच्छा पेठ परिसरातील दररोज 7 हजार 221 घराची तपासणी करण्यात येत आहे.
सोलापूर जिल्ह्यात होम क्वारंटाईन- 1 हजार 466
475 व्यक्तीचा- 14 दिवसाचा कालावधी संपला
होम क्वारंटाईन- 991 व्यक्ती
आयसोलेशन वार्ड- 474 जण
निगेटिव्ह रिपोर्ट- 448
प्रलंबित रिपोर्ट- 14
इन्स्टिटय़ूशनल-625 -243 जणांचा कालावधी संपला
इनिस्टटय़ूशनल क्वारटाईनमध्ये- 686
सोलापूर जिल्ह्यात- कोरोना बाधीत संख्या- 12