तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
नवरात्र उत्सव व दसरा निमित्ताने सोलापूर मधील स्पर्शरंग परिवाचे युवा कलाकार विपुल मिरजकर आणि सह कलाकार यांनी कुचन हायस्कूल मैदानावर दसऱ्याच्या सणाचे औचित्य साधून (260X150 फूट) आकारात भव्य दिव्य मा दुर्गा देवीची पाषाण खडी आणि रंगांचा वापर करून प्रतिमा साकारली आहे.
लेक वाचवा, बेटी बचाओ-बेटी पढाओ व समाजात होणारे बलात्काराचे प्रकार थांबावे, यासाठी सुद्धा सामाजिक संदेश यातून दिला आहे. या कलाकृतीसाठी 25 दिवसांचा कालावधी लागला. तसेच याचा विश्वविक्रम बुकसाठी सुद्धा नोंदणीसाठी अर्ज केला आहे. जागतिक कोरोना महामारीच्या काळात सर्व सण, उत्सव आपण वेगळ्या पद्धतीने साजरी करत आहोत. तरी या सर्व सहकलाकारांनी मिळून एक वेगळ्या प्रकारे दसऱ्याच्या शुभ दिनी माँ दुर्गा देवीची प्रतिमा साकारून भारतवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी प्रतिकृती काढलेल्या कलाकारांमध्ये विपुल मिरजकर, प्रमोद दासरी, निखिल तलकोकुल, शुभम कामठी, आशिष रेगल आणि सपोर्टिंग टीममध्ये कुचन प्रशाला सोलापूर, शिक्षक विशाल काळे आणि सागर सुब्रमणी भारती (अभियंता, विश्वविक्रमवीर) हे आहेत.
लागलेले साहित्य : पाषाण खडी – 24 ब्रास, रंग (5 रंग) – 150 लिटर