तरुण भारत संवाद सोलापूर / प्रतिनिधी
सोलापूर शहर व जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील हॉटेल, लॉज , गेस्ट हाउस इत्यादी निवासाच्या सुविधा पुरवणाऱ्या आस्थापना सुरू करण्यास परवानगी दिली असून त्यासंदर्भात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज गुरुवारी आदेश काढले आहेत. दरम्यान लॉज आण हॉटेलला मान्यता देत असताना ते 33 टक्के इतक्या मनुष्यबळासह या आस्थापना सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. सोलापूर शहर जिल्ह्यात कोरोनाचा विळखा वाढत असल्यामुळे व कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोलापुरातील लॉज आणि हॉटेल बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र आता सोलापूर शहर जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेर हॉटेल, लॉज गेस्ट हाउस सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाच्यावतीने हिरवा कंदील देण्यात आलेला आहे. हॉटेल रेस्टॉरंट आणि इतर सेवा, विल्लगे करण्यासाठी वापरण्यात येत असल्यास त्याचा वापर आवश्यक असल्यास पुढे तसाच चालू ठेवण्यात येणार आहे. या आस्थापनांच्या उर्वरित वापरलेल्या 67 टक्के भागापैकी, पूर्ण भाग विलगीकरण करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. सभागृहातील बैठकीसाठी सभागृहाच्या क्षमतेचा 30 टक्के वापर करावा त्या ठिकाणी जास्तीत जास्त पंधरा व्यक्तींना परवानगी देण्यात यावी अशीही सूचना करण्यात आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचे ठळक आदेश
- आस्थापनांच्या प्रवेशाच्या ठिकाणी ग्राहकांची थर्मल स्क्रीनिंग बंधनकारक
- स्वागत कक्षाची जागा अथवा टेबल च्या ठिकाणी संरक्षक काच असावी
- रेस्टॉरंट साठी योग्य सामाजिक आंतर राखण्याची सूचना करण्यात आली आहे
- मेन्यू कार्ड ऐवजी ई मेनू कार्ड
- डिस्पोजेबल पेपर नॅपकीनचा जास्त वापर करा
- रेस्टॉरंट केवळ अतिथींना राहण्यासाठी उपलब्ध करावीत
- एकत्र टेबलावर जेवण्याऐवजी पार्सल सेवा अथवा रूम सेवेचा वापर करावा
- आस्थापना मधील गेमिंग ऑर्किडस मुले खेळण्याचे क्षेत्र, जलतरण तलाव, व्यायाम शाळा बंद ठेवणे बंधनकारक
- मोठ्या सार्वजनिक मेळाव्यार हॉटेल आणि लॉज गेस्ट हाउस इत्यादीमध्ये बंदी