तरुण भारत संवाद सोलापूर : प्रतिनिधी
सोलापुरात सोमवारी नव्याने 25 कोरोना बाधीत रुग्णांची भर पडली तर 7 जणांचा मृत्यु झाला. यामध्ये 12 पुरुष आणि 13 स्त्रियांचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 608 वर पोहचली आहे. उर्वरित व्यक्तींवर सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सोमवारी दिली.
सोमवारी, 25 मे रोजी 196 जणांचे तपासणी अहवाल प्राप्त झाले. यातील 25 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 171 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले.
यामध्ये कुमठा नाका 1, बुधवार पेठ 1, न्यु बुधवार पेठ 1, वै.स्मृ . शासकीय वैदयकिय महाविद्यालय 3, भारतरत्न इंदिरा नगर 3, आंबेडकर नगर 1, कर्णिक 2, दत्त नगर समयुक्त झोपडपट्टी 2, शिवगंगा मंदिर, मराठा वस्ती 2, मार्कंडेय चौक, MIDC सोलापूर 1, लष्कर 1, समाधान नगर, अक्कलकोट रोड, सोलापूर 1, जुना विडी घरकुल 1, साखर पेठ 1, उत्तर कसबा 1, भैय्या चौक 1, हिरज, ता. उत्तर सोलापूर 1 असे एकूण 25 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. रुग्णालयातून 277 जन बरे होऊन घरी गेले. तर आज 7 जणांचा मृत्यू झाला आहे.