तरुण भारत संवाद, प्रतिनिधी / सोलापूर
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती
एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 390
158 बरे, 26 मृत
सोलापुरात नव्याने 5 कोरोना बाधीत रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये 3 पुरुष, 2 स्त्रियांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितसंख्या 390 वर पोहचली आहे. उर्वरित व्यक्तींवर सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सोमवारी दिली.
आज, एकूण 175 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 170 जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला तर 5 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. एकूण 4274 जणांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी 3884 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. कोरोनाबधितची संख्या 390 वर गेली आहे. कोरोनामुक्त झालेल्या 158 जणांना घरी सोडण्यात आले आहेत. तर आतापर्यत 26 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यंत असून उर्वरित माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर सायंकाळी देणार आहेत.