एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 583 वर
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापुरात काल नव्याने 18 कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये 10 पुरुष, 8 स्त्रियांचा समावेश आहे. तर एकाच दिवशी 5 जणांचा मृत्यू झाला असून 51 वा बळी कोरोनाने घेतला आहे. काल 5 तर आतापर्यंत 254 व्यक्ती बरे होऊन घरी गेली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितसंख्या 583 वर पोहचली आहे. उर्वरित 278 व्यक्तींवर सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी रविवारी दिली.
काल 5 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. काल आढळलेल्या रुग्णांमध्ये घोंगडे वस्ती 1, शनिवार पेठ 1, नीलम नगर 2, शास्त्री नगर 1, रविवार पेठ 2, सलगर वस्ती 1, दमानी नगर 1, गंगानगर 1, न्यू पाच्छा पेठ 2, मजरेवाडी1, एमाआयडिसी एक, मुळेगाव एक , सब जेल 1, वरद फ्रॉम पुणे रोड ,सोलापूर 1, पाच्छा पेठ 1 असे या भागातील नवीन रुग्ण आढळले आहेत.
काल एकूण 120 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 102 जणांचा रिपोर्ट निगेटिव आला तर 18 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आतापर्यंत 583 कोरोनाबधितची संख्या झाली आहे. यामध्ये 323 पुरुष तर 260 स्त्री आहेत. 278 रुग्ण सिव्हिल रुग्णालयात उपचार घेत आहेत तर 51 व्यक्ती मृत झाले आहेत. आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या 254 जणांना घरी सोडण्यात आले आहेत.
सोलापुरातील कोरोनाची सद्यस्थिती
होम क्वांरटाईन-7450
एकूण अहवाल प्राप्त : 5543
आतापर्यंत अहवाल निगेटीव्ह : 4960
आतापर्यंत अहवाल पॉझीटीव्ह : 583
उपचार सुरू- 278
बरे होऊन घरी गेले : 254
मृत- 51