एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 565 वर
तरुण भारत संवाद प्रतिनिधी/सोलापूर
सोलापुरात नव्याने 49 कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये 27 पुरुष, 22 स्त्रियांचा समावेश आहे. तर एकाच दिवशी 6 जणांचा मृत्यू झाला असून 46 वा बळी कोरोनाने घेतला आहे. आज 25 तर आतापर्यंत 249 व्यक्ती बरे होऊन घरी गेली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितसंख्या 565 वर पोहचली आहे. उर्वरित 270 व्यक्तींवर सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी शनीवारी दिली.
आज मृत झालेले 46 वर्षाचे पुरुष मधला मारुती गल्ली अक्कलकोट परिसर, दुसरे व्यक्ती उत्तर कसबा पत्रा तालीम 71 वर्ष पुरुष , तिसरे व्यक्ती शिवशरण नगर एमआयडीसी 52 वर्षे पुरुष, मिलिंद नगर बुधवार पेठ 69 वर्षाची महिला, मोदी परिसर 67 वर्षाची महिला, न्यू पाच्छा पेठ 78 वर्षीय महिला अशा 6 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला.
आज आढळलेल्या रुग्णांमध्ये गंगा चौक नीलम नगर 1, राऊत वस्ती मजरेवाडी 1,कुरबान हुसेन नगर 1,कर्णिक नगर 1, कुमठा नाका 2, बुधवार पेठ 1, सिद्धेश्वर नगर 1, फॉरेस्ट रेल्वे लाइन्स1, विडी घरकुल 2, जुना विडी घरकुल 2, भारतरत्न इंदिरा नगर 4, मोदी पोलीस स्टेशन 2, पाच्छा पेठ 3, बादशाहा पेठ 2, न्यू बुधवार पेठ 3,मैत्री नगर एमआयडीसी रोड 2, निखिल पार्क आरटीओ जवळ 1,शाहीर वस्ती भवानी पेठ 1,मोदी 1, सुशील नगर विजापूर रोड 1, अंबिकानगर एमआयडीसी रोड 1, साईबाबा चौक 3, बाळीवेस 5, सात रस्ता परिसर 1, पोलीस मुख्यालय अशोक चौक 1,श्यामा नगर मोदी 3, मधला मारुती गल्ली अक्कलकोट 1 सिव्हिल हॉस्पिटल कॉर्टर 1 असे या भागातील नवीन रुग्ण आढळले आहेत.
आज एकूण 229 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 180 जणांचा रिपोर्ट निगेटिव आला तर 49 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आतापर्यंत 565 कोरोनाबधितची संख्या झाली आहे. यामध्ये 313 पुरुष तर 252 स्त्री आहेत. 270 रुग्ण सिव्हिल रुग्णालयात उपचार घेत आहेत तर 46 व्यक्ती मृत झाले आहेत. आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या 249 जणांना घरी सोडण्यात आले आहेत.
सोलापूरातील कोरोना सद्यस्थिती
होम क्वांरटाईन-7573
एकूण अहवाल प्राप्त : 5423
आतापर्यंत अहवाल निगेटीव्ह : 4858
आतापर्यंत अहवाल पॉझीटीव्ह : 565
उपचार सुरू- 270
बरे होऊन घरी गेले : 249
मृत- 46