तरुण भारत संवाद प्रतिनिधी/सोलापूर
सोलापुर शहरात आज, रविवारी रात्री 8 वाजेपर्यंत 62 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले तर 3 जणांचा मृत्यू झाला. तसेच उपचार घेऊन बरे झाल्याने 11 जणांना घरी सोडण्यात आल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.
रविवारी 256 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 62 पॉझिटीव्ह तर 194 अहवाल निगेटिव्ह आले. एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1605 झाली आहे. तसेच उपचारादरम्यान 3 जणांचा मृत्यू झाला.
सोलापूर शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 1605
-आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 136
-रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 667
-रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले बाधितांची संख्या : 802
-एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 9254
-प्राप्त तपासणी अहवाल : 1903
-प्रलंबित तपासणी अहवाल : 151
-निगेटिव्ह अहवाल : 7498