तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापुरातील बापूजीनगर, कुर्बानहुसेन नगर, पाच्छा पेठ, जगन्नाथ नगर, भद्रावती पेठ येथे सोमवारी नव्याने दहा कोरोनाबाधीत रूग्ण आढळले. त्यामुळे सोलापुरात कोरोनाबाधीतांची संख्या 25 वर पोहोचली असून त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित 23 जणांवर सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिली. सोलापूर शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने 19 एप्रिल ते 23 एप्रिल दरम्यान सोलापुरात संपूर्ण संचारबंदी, हद्द बंद करण्यात आली आहे. दुपारी दोननंतर सोलापुरात सामसूम झाल्याचे चित्र आढळले.
नवीन सापडलेले रूग्ण हे तेलंगी पाच्छा पेठ, कुर्बान हुसेननगर, जगन्नाथनगर, बापूजीनगर, भद्रावती पेठ येथील असून हा पूर्ण परिसर सील करण्यात आला असल्याचे शंभरकर यांनी सांगितले. सोलापुरातील आयसोलेशन वॉर्डात 692 व्यक्ती होत्या. त्यापैकी 630 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून, यापैकी 605 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. 162 जणांचा अहवाल प्रलंबित आहे, तर 25 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळले आहेत. सोलापुरात नव्याने दहा कोरोनाबाधित रूग्ण आढळल्यामुळे सोलापुरात घबराटीचे वातावरण पसरले असून सोलापूर आता रेड झोनमध्ये गेल्याची चर्चा सुरू आहे.
घरातच बसा, प्रशासनास सहकार्य करा
सोलापुरात गुरूवारपर्यत संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली असून सर्वांनी याचे पालन करावे. नागाfरकांनी घरातच बसावे. नागाfरकांना अडचण येणार नाहि याची काळजी जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन घेईल. प्रशासनास सहकार्य करा. वेळोवेळी हात धुवा, मास्कचा वापर करा, एकमेकांमध्ये अंतर ठेवा.
मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी, सोलापूर