तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापुरात कोरोनाबाधित आणखी पाच रुग्ण आढळले आहेत. मोदीखाना, शास्त्रीनगर, जोशी गल्ली, शनिवार पेठ, मदर इंडिया झोपडपट्टी येथील रुग्ण आहेत. एका 75 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. शहरातील कोरोनाच्या रुग्णाची एकूण संख्या 30 झाली आहे. यातील 3 रुग्ण मृत झाले आहे. उर्वरित 27 जणांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी मंगळवारी दिली.
सोलापूर शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे जिल्हाप्रशासनाच्यावतीने 19 एप्रील ते 23 एप्रिलदरम्यान सोलापुरात संपूर्ण संचारबंदी, हद्द बंद करण्यात आली आहे. त्यामुळे सोलापुरातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये असेहि जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले. सोलापुरात यापूर्वी कोरोनाबाधीतांची संख्या 19 होती. आता यामध्ये मोदिखाना 1, शास्त्रीनगर 1, जोशी गल्ली 1, शनिवार पेठ 1, मदर इंडिया झोपडपट्टी मध्ये 1 असे 5 रुग्णांची भर पडली असून आता सोलापुरात 30 कोरोनाबाधीत रूग्णांची संख्या झाली आहे. यामध्ये 4 सारीचे रुग्ण असून एक रविवार पेठेतील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेले व्यक्ती आहे. एका 75 वर्षाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला.
सोलापुरातील आयसोलेशन वार्डात 851 व्यक्ती होते त्यापैकी 654 जणांचे अहवाल प्राप्त झाला असून यापैकी 624 जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असून 197 जणांचा अहवाल प्रलंबित आहे, तर 20 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळले आहेत. सोलापुरात नव्याने पाच कोरोनाबाधित रूग्ण आढळल्यामुळे सोलापुरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. शहरात एकूण नगर कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आल्याचे शंभरकर यांनी सांगितले.
सोलापूरातील कोरोना सद्यस्थिती
आयसोलेशन वार्डात 851
-एकूण अहवाल प्राप्त : 654
-आतापर्यंतअहवाल पॉझीटीव्ह : 30
-मृत : 03
-अहवाल येणे बाकी : 197