तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
परभणी जिह्यातील कोठाळा सोनपेठ येथील ऊसतोड कामगार असलेल्या पती-पत्नीमध्ये झालेल्या किरकोळ वादातून पतीने काठीने पत्नीच्या डोक्यात मारून तिचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे.
पत्नी चक्कर येऊन पडल्याचा बनाव करणाऱया पतीचे बिंग पोलीस चौकशीतून तसेच वैद्यकीय अहवालामुळे फुटले. याप्रकरणी ऊसतोड कामगाराविरुद्ध मंद्रूप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. ही घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील चिंचपूर गावाच्या परिसरात घडली.
परभणी जिह्यातील उसतोड असलेल्या पती-पत्नीमध्ये वाद होवून पतीने काठीने मारहाण केल्यामुळे पत्नीचा मृत्यू झाला आहे. सामका कृष्णा राठोड (वय 20, रा. कोठाळ, सोनपेठ, जि. परभणी) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून पोलिसांनी पती कृष्णा राठोड (वय 25) याला ताब्यात घेतले आहे.
सामका आणि कृष्णा राठोड हे दाम्पत्य हे सोलापुरात उसतोडीसाठी आले होते. चालू आठवडय़ामध्ये त्यांची टोळी ही दक्षिण सोलापूर तालुक्यातील चिंचपूर येथील शिवराया कोणदे यांच्या शेतामध्ये काम करित होते. दोघा पत्नी-पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून सारखे वाद होत होते. शनिवार 18 जानेवारी रोजी सायंकाळी सातच्या सुमारास दोघा पती-पत्नीमध्ये वाद झाले. या रागातून चिडून पती कृष्ण राठोड यांने पत्नी सामका हिच्या डोक्यात काठीने जोरात मारले. काठीचा मार जोरात बसल्याने पत्नी सामका हिचा जागीच मृत्यू झाला.
यानंतर अचानक चक्कर येवून पडल्याचा बनाव करित तिला उपचारासाठी सिव्हील हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. दाखल करताना पोलिसांना दिलेल्या माहितीमध्ये चक्कर येवून पडल्याचे सांगितले. त्यानंतर सामका हिची तपासणी केल्यानंतर उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. यानंतर सामका हिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी मंद्रुप पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप धांडे यांनी कृष्णा राठोड याच्याकडे अधिक विचारपूस केल्यानंतर कृष्णा राठोड यांने काठीने मारून खून केल्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी कृष्णा याला ताब्यात घेतले असून रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते.