तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापुरात नव्याने 64 कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये 43 पुरुष, 21 स्त्रियांचा समावेश आहे. तर 5 जणांचा मृत्यू झाला असून 99 वा बळी कोरोनाने घेतला आहे. आज 15 तर आतापर्यंत 484 व्यक्ती बरे होऊन घरी गेली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितसंख्या 1044 वर पोहचली आहे. उर्वरित 561 व्यक्तींवर सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी गुरूवारी दिली.
आज पाच जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यापैकी 4 पुरुष, एक महिलेचा मृत्यू झाला आहे. न्यू पाच्छा पेठ परिसरातील, जुनी वाडी घरकुल , जोडभावी पेठ, आशा नगर एमआयडीसी, मुरारजी पेठ परिसरातील आहेत. मृत्यूनंतर त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
आज नव्याने आढळलेला रुग्णांपैकी नव कल्याण नगर रविवार पेठ 2, मुरारजी पेठ एक, जुनी वडी घरकुल 2, बुधवार पेठ 2, साखर पेठ 1, डफरीन कॉटर दोन, जोड भावी पेठ एक, भवानी पेठ 6, बेघर सोसायटी विजापूर रोड, विजापूर नाका , चंडक नगर आसरा, रेल्वे लाइन्स, विनायक नगर एमआयडीसी, सोलापूर संगमेश्वर नगर, अक्कलकोट रोड, यामिनी नगर विजापूर रोड, शुक्रवार पेठ, दाजी पेठ, भागवत टॉकीज जवळ, सदर बाजार लष्कर, अक्कलकोट रोड मार्केट यार्ड जवळ, आशा नगर एमआयडीसी रोड सोलापूर, कुमठा नाका, एकतानगर, नीलम नगर, नागनाथ सोसायटी एमआयडीसी, मोदीखाना, इंदिरा नगर विजापूर रोड, गुरूनानक चौक, स्वप्नपूर्ती सर्वोदय हाउसिंग सोसायटी, उक्कडगाव तालुका बार्शी, वाणी प्लॉट आगळगाव रोड तालुका बार्शी, मुळेगाव पारधी वस्ती तालुका दक्षिण सोलापूर, अनिल नगर पंढरपूर प्रत्येकी एक, चंद्रोदय नगर कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर 2, घरकुल कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर 8, नवीन घरकुल कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर 8, जामगाव तालुका बार्शी 3 आदी रुग्णांचा समावेश आहे.
आज एकूण 353 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 289 जणांचा रिपोर्ट निगेटिव आला तर 64 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आतापर्यंत 1044 कोरोनाबधितची संख्या झाली आहे. यामध्ये 671 पुरुष तर 473 स्त्री आहेत. 561 रुग्ण सिव्हिल रुग्णालयात उपचार घेत आहेत तर 99 व्यक्ती मृत झाले आहेत. आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या 484 जणांना घरी सोडण्यात आले आहेत.
सोलापूरातील कोरोना सद्यस्थिती
- होम क्वांरटाईन- 4281
-एकूण अहवाल प्राप्त : 8213
-आतापर्यंत अहवाल निगेटीव्ह : 7069
-आतापर्यंत अहवाल पॉझीटीव्ह : 1044 - उपचार सुरू- 561
- बरे होऊन घरी गेले : 484
- मृत- 99