जिल्ह्यात एकूण कोरोना बाधितांची संख्या 196 वर, दोघांचा मृत्यू
तरुण भारत संवाद प्रतिनिधी/सोलापूर
सोलापुरात आज, शुक्रवारी नव्याने 14 कोरोना बाधीत रुग्णांची भर पडली. ज्यामधे 8 पुरूष आणि 6 महिलांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितसंख्या 196 वर पोहचली असून उर्वरित व्यक्तींवर सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
सोलापूरात आत्तापर्यंत 2874 जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. यापैकी 2665 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. यातील 2469 निगेटिव्ह तर 196 पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. आत्तापर्यंत 29 जणांना बरे झाल्यानं घरी सोडण्यात आले आहे.
शुक्रवारी एका दिवसात 170 अहवाल पैकी 14 पॉझिटिव्ह तर 156 निगेटिव्ह अहवाल आले. हे 14 रुग्ण गवळी वस्ती, जुना कुंभारी रोड 1, शास्त्रीनगर 1, हुडको नं. 3 कुमठा नाका 1, समर्थ नगर सिव्हीलमागे 1, गीता नगर, न्यु पाच्छापेठ 1, भारतरत्न इंदिरा नगर 1, संजय नगर कुमठा नाका 1, रविवार पेठ 1, न्यू पाच्छा पेठ 3, मोदीखाना 1, सदर बझार 1 आणि सिध्देश्वर पेठ 1 असे या भागातील 14 रुग्णांचा समावेश आहे.
आज मृत पावलेल्यांमध्ये शास्त्रीनगर येथील 56 वर्षीय महिलेचा समावेश आहे. ती 25 एप्रिल रोजी सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाली होती. आज पहाटे ती मृत पावली. तर दुसरी व्यक्ती रंगभवन परिसरातील 76 वर्षीय पुरूष असून 5 मे रोजी उपचारास दाखल करण्यात आले होते. आज 8 मे रोजी पहाटे मृत पावले.
सोलापुरातील कोरोना सद्यस्थिती
-होम क्वारंटाईनमध्ये : 5870
-एकूण अहवाल प्राप्त : 2665
-आतापर्यंत अहवाल निगेटीव्ह : 2469
-आतापर्यंत अहवाल पॉझीटीव्ह : 196
-अहवाल प्रलंबित : 209
बरे होऊन घरी गेले : 29