तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापुरात नव्याने 81 कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये 38 पुरुष, 43 स्त्रियांचा समावेश आहे. तर एकाच दिवशी 6 जणांचा मृत्यू झाला असून 72 वा बळी कोरोनाने घेतला आहे. आज 10 तर आतापर्यंत 321व्यक्ती बरे होऊन घरी गेली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितसंख्या 748 वर पोहचली आहे. उर्वरित355 व्यक्तींवर सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी गुरुवारी दिली.
आज 6 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामध्ये 4 पुरुष, 2 स्त्रीचा समावेश आहे. जामगाव तालुका बार्शी 66 वर्षाचे पुरुष, भवानी पेठ येथील 54 वर्षाचे पुरुष, जुनी घरकुल परिसरातील 61 वर्षाची महिला, किडवाई चौक बेगमपेठ 70 वर्षाची महिला, शास्त्रीनगर 72 वर्षाचे पुरुष, रविवार पेठ 76 वर्षाचे पुरुष असे मृत व्यक्ती आहेत. त्यानंतर त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
आज आढळलेल्या रुग्णांमध्ये सब जेल सोलापूर 2, शास्त्रीनगर एक, केशवनगर पोलीस लाईन एक, पाच्छा पेठ 1, बाळवेस उत्तर कसबा 1, अशोक चौक 1, बेगमपेठ 1, जुनी विडी घरकुल 3, भूषण नगर 1, बुधवार पेठ 2, सुनील नगर एमआयडीसी 2, घोंगडे वस्ती भवानी पेठ 1, संगमेश्वर नगर अक्कलकोट रोड 1, रविवार पेठ 2, बेघर हौसिंग सोसायटी, विजापूर नाका -1, हनुमान नगर -1,निलम नगर -3, डॉक्टर वसाहत सोलापूर-1,रेल्वे लाईन्स -1, न्यु विडी घरकुल- 1, कर्णिक नगर-6, इंदिरा नगर -1, म्हेत्रे नगर, एमआयडीसी 3, न्यु बुधवार पेठ – 5, कल्पना नगर -1, दक्षिण सदर बझार -1, जुना पुना नाका- 7, एकता नगर – 1, वसंत नगर पोलीस लाईन -1, शनिवार पेठ -2, मजरेवाडी -2, भवानी पेठ- 4, मडके वस्ती पुना नाका -10, कुमठा नाका – 1, बादशाह पेठ – 2, विडी घरकुल -2, निजामपूर, ता. सांगोला -1, मधला मारुती, अक्कलकोट -1, मौ. शेंद्री ता. बार्शी – 1आदी समावेश आहे.
आज एकूण 268 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 187 जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला तर 81 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आतापर्यंत 748 कोरोनाबधितची संख्या झाली आहे. यामध्ये 397 पुरुष तर 341 स्त्रिया आहेत. 355 रुग्ण सिव्हिल रुग्णालयात उपचार घेत आहेत तर 72 व्यक्ती मृत झाले आहेत. आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या 321 जणांना घरी सोडण्यात आले आहेत.
सोलापूरातील कोरोना सद्यस्थिती
– होम क्वांरटाईन – 7405
– एकूण अहवाल प्राप्त – 6428
– आतापर्यंत अहवाल निगेटीव्ह – 5680
– आतापर्यंत अहवाल पॉझीटीव्ह – 748
– उपचार सुरू – 355
– बरे होऊन घरी गेले – 321
– मृत – 72