प्रतिनिधी / सोलापूर,
पती-पत्नीला धाप लागत होता. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात उपचारास दाखल केले होते. परंतु दोघांचा एकाच दिवशी गुरुवारी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
अंबादास नरसिंग बेळमकर (वय 70) व शांताबाई अंबादास बेळमकर (वय 65, दोघे रा. एकतानगर, वालचंद महाविद्यालयाजवळ) अशी मरण पावलेल्या पती-पत्नीचे नाव आहे. या दोघांना धाप लागत असल्याने 19 एप्रिल रोजी उपचारास शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार चालू असताना बुधवारी मध्यरात्री पत्नी शांंताबाई व गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजता पती अंबादास यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहेे. एकाच दिवशी पती-पत्नीचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.