प्रतिनिधी / सोलापुर
सोलापुरात नव्याने तीन कोरोना बाधीत रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये तीन पुरुष आहेत.यातील 6 मृत आहेत. आतापर्यंत 10 जण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितसंख्या 114 वर पोहचली असून उर्वरित 98 व्यक्तींवर सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी शनिवारी दिली.
आज 32 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 29 अहवाल निगेटिव्ह आले तर 3 अहवाल पॉझिटीव्ह आले. यातील पोलीस चौकी, अशोक चौक 2, गवळी वस्ती 1 येथील व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर केगाव येथील इन्स्टिट्यूशनल कोरंटाईन मधील एकूण 44 रुग्णांना घरी सोडले आहे. तर मोहोळ येथील 16, पंढरपूर येेेथील पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या 48 व्यक्तींचे टेस्ट निगेटिव्ह आले आहेत. तर चपळगाव येथील 78 जणांचे चाचणी करण्यात आली. सर्व जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यााचे श्री शंभरकर यांनी सांगितले.