तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापुर
सोलापुरात कोरोनाबाधित आणखी 9 रुग्ण पॉझिटिव्हआढळले आहेत. यापैकी चार शांतीनगर, कुमठा नाका 1, लष्कर 1, मोदीखाना 2, आणि सांगोला येथील 1 व्यक्तीच्या समावेश आहे. आढळलेल्या रुग्णांमध्ये पाच सारी, पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील 3 व्यक्ती, 1 ग्रामीण भागातील आहे. शहरातील कोरोनाच्या रुग्णाची एकुण संख्या 50 झाली आहे. यातील 4 रुग्ण मृत झाले आहे. उर्वरित 46 जणांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी शनिवारी दिली.
सांगोला येथील आढळलेल्या पॉझिटिव व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती घेण्यात येत आहे. तो भाग कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. सोलापुरात आज एकूण 82 अहवाल प्राप्त झाले होते. त्यापैकी 73 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर उर्वरित नऊ जणांची रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. शुक्रवारपर्यंत सोलापुरात कोरोनाग्रंताची संख्या 41 होती त्यामध्ये 9 ने वाढ झाली असून संख्या 50 झाली आहे. 4 मृत झाले आहेत.
सोलापुरातील आयसोलेशन वार्डात 1129 व्यक्ती होते त्यापैकी 987 जणांचे अहवाल प्राप्त झाला असून, यापैकी 937 जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.तर 50 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळले आहेत. सोलापुरात नव्याने 9 कोरोनाबाधित रूग्ण आढळल्यामुळे व कोरोनाचे रुग्ण 50 झाल्यामुळे सोलापुरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.