प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर शहरातील महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा विळखा कमी होत चालला आहे, मात्र दुसरीकडे डेंग्यूचा धोका वाढला आहे. आतापर्यंत तिघांचा डेंग्यूने मृत्यू झाला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे.
पालिकेच्या बैठका सुरू आहेत. त्याचप्रमाणे विविध प्रभागात दौरे, फवारणी, धुवारणी करीत आहे. त्यामुळे आता नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. दरम्यान महापालिकेच्यावतीने याठिकाणी डेंग्यू सदृश्य रुग्ण आढळत आहेत त्या ठिकाणी फवारणी करून सर्व्हे करत महापालिकेच्या आरोग्य यंत्रणा कार्यान्वित झाली आहे.
सोलापूर शहरात कोरोनाबरोबर आता डेंग्यूने डोके वर काढले आहे. हा रोग नवीन नाही मात्र कोरोना प्रादुर्भाव असतानाही साथ सुरू झाल्याने महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेवर ताण पडला आहे. आरोग्य विभागाने शहराच्या विविध भागात फवारणी फवारणी सुरु केली आहे. महापालिकेच्या शहर व हद्दवाढ भागात कार्यरत असलेल्या पंधरा नागरी आरोग्य केंद्राच्या माध्यमातून हा कंटेनर सर्वे सुरू आहे.
शहरातील डेंग्यू तात्काळ आटोक्मयात आणा ः महापौर
शहरात डेंग्यू बाबत प्रत्येक टीमने दीडशे घरांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करा. सकाळ व संध्याकाळ अशा दोन सत्रात शहरात प्रत्येक ठिकाणी धुराळणी व फवारणी करा. प्रभागात फिरणाऱया घंटागाडीवरून डेंग्यूबद्दल बोलकी जाहिरात प्रसारित करून तसेच इतर आवश्यक त्या उपाय योजना करून शहरातील डेंग्यू तात्काळ आटोक्मयात आणा, अशा सूचना महापौर श्रीकांचना यन्नम यांनी आरोग्य विभागाला दिल्या. डेंग्यू रुग्णांसाठी डफरीन हॉस्पिटलमध्ये बेडची सोय करण्यात आली. संबंधित रुग्णांनी येथे उपचार घ्यावे, असे आवाहन महापौर यन्नम यांनी केले.
डेंग्यूचे रुग्ण आढळणारी ठिकाणे
सोलापूर शहरातील विशेषता जुळे सोलापूर, न्यू पाच्छा पेठ, होटगी रोड, बुधवार पेठ, हद्दवाढ भागात परिसरात डेंग्यूचे डास आढळले आहेत.
ही आहेत डेंग्यूची लक्षणे
– सर्दी, ताप, खोकला येतो
– अंगावर लहान लहान पुरळ येतात, जेवण केल्यावर मळमळ होते
– रक्तातील प्लेटलेट्स कमी होतात
– पावसाळा सुरू झाला की अशा रोगांचा प्रसार होतो
लक्षणे आढळल्यास तपासणी करा ः हराळकर
डेंग्यू हा स्वच्छ पाण्यात होतो. त्यामुळे पाणीसाठा ठेवू नये. कोरडा दिवस पाळावा. लक्षणे आढळल्यास त्वरित उपचार घ्यावे. महापालिका प्रशासनाच्या वतीने फवारणी, धुराळणी सुरू आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी – डॉ. अरुंधती हराळकर, मनपा आरोग्य अधिकारी