जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती
एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 461, 168 बरे, 32 मृत
प्रतिनिधी/ सोलापूर
सोलापुरात नव्याने 5 कोरोना बाधीत रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये 1 पुरुष, 4 स्त्रियांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितसंख्या 461 वर पोहचली आहे. उर्वरित व्यक्तींवर सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी बुधवारी दिली.
आज, एकूण 126 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 121 जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला तर 5 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. एकूण 4738 जणांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी 4277 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. कोरोनाबधितची संख्या 461 वर गेली आहे. कोरोनामुक्त झालेल्या 168 जणांना घरी सोडण्यात आले आहेत. तर आतापर्यत 32 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी बुधवारी सकाळी 8 वाजेपर्यंत असून उर्वरित माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर सायंकाळी देणार आहेत.