सोलापूर-पुणे हायवेवर टायर जाळून केले आंदोलन
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाले असून सकाळच्या आंदोलन दडपल्यानंतर गनिमी काव्याने दुपारच्या सत्रात सोलापूर पुणे हायवेवर टायर जाळून आंदोलन करण्यात आले. यावेळी एक मराठा लाख मराठा, तुमचं आमचं नातं काय जिजाऊ, जय शिवराय, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
आता गनिमी काव्याने आंदोलन, प्रसंगी आमचं रक्त सांडू आता माघार नाही
मराठा आरक्षणासाठी 58 मूक मोर्चे काढण्यात आले, समाजातील 48 जणांनी आरक्षणासाठी बलिदान दिले, महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण साठी विविध संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणला स्थगिती दिल्यामुळे मराठा समाजावर अन्याय झाल आहे. लाखो विद्यार्थ्यांचे या निर्णयामुळे आयुष्य उध्वस्त झाल आहे. आज ही आंदोलनाची सुरवात आहे. आता मराठा आरक्षणसाठी गनिमी कावाने आंदोलन करण्यात येणार आहे. शासनाला झोपू देणार नाही. वेळ आली तर मराठा आरक्षणसाठी आम्ही आमच रक्त सुध्दा सांडण्यास तयार आहे .पण आता माघार नाही.
– राम जाधव, समनव्यक (मराठा क्रांती मोर्चा)
यावेळी मराठा क्रांती मोर्चा समनव्यक राम जाधव, समनव्यक किरण पवार, अजिंकय पाटील, निखिल थोरात, राहुल दहीहंडे, सौदागर क्षीरसागर आदी उपस्थित होते.