जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती
एकूण कोरोना बाधित व्यक्तींची संख्या झाली 570
सोलापूर / प्रतिनिधी
सोलापुरात कोरोना पॉझिटीव्हचे नविन ५ रुग्ण आढळले आहेत. ज्यामध्ये ४ पुरुष व १ महिलेचा समावेश आहे. तरी एकूण कोरोना बाधित व्यक्तींची संख्या 570 झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
आज सकाळी 8 वाजेपर्यंत 77 जणांचे तपासणी अहवाल आले. यामध्ये ५ जणांचे अहवाल पॉजिटिव तर ७२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. सोलापुरातील एकूण मृत व्यक्तींची संख्या आता ४६ झाली आहे. कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीची संख्या २४९ झाली आहे. सोलापुरातील ५५०० जणांची आतापर्यंत कोरोना चाचणी करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ४९३० रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. 570 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. ही आकडेवारी रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंतची आहे उर्वरित माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर संध्याकाळी देणार आहेत.