सोलापुर / प्रतिनिधी :
शुक्रवारी रात्री 9 वाजेपर्यंत सोलापुर शहारत तब्बल 101 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले तर 4 जणांचा मृत्यू झाला. तसेच उपचार घेऊन बरे झाल्याने 9 जनांना घरी सोडण्यात आल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी शुक्रवारी दिली.
शुक्रवारी 255 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 101 पॉझिटीव्ह तर 154 अहवाल निगेटिव्ह आले. एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1502 झाली आहे. आज सापडलेले 101 पॉझिटीव्ह रुग्ण व्यंकटेश नगर, मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर, मुकुंदनगर , भवानी पेठ दाळगे प्लॉट , भवानी पेठ दाजी पेठ नामदेव नगर , भवानी पेठ गांधीनगर पुर्व मंगळवार पेट , बाळीवेस सिध्देश्वर नगर होमकर नगर, भवानी पेठ, रोटे कॉम्प्लेक्स , गांधीनगर गुमटे निवास, बुधवार पेठ, विजयालक्ष्मी नगर, भाग -१, भवानी पेठ तोडकर वस्ती, बाळे भाग्यलक्ष्मी नगर, मजरेवाडी, सम्राट चौक, साखरपेठ, आसरा हौसिंग सोसायटी, होटगी रोड, चंडक नगर, सैफुल, विजापूर रोड, हाजी हजरतखान चाळ, मुरारजी पेठ, निराळे वस्ती, राठी चाळ, भवानी पेठ, उत्तर कसबा, सोमाणी मंगल कार्यालयजवळ, भवानी पेठ, पाच्छा पेठ, शिखवस्ती, भवानीपेठ, न्यु बुधवार पेठ, कामाक्षी नगर, शेळगी, जुना विजापूर नाका, टंकसाळ नगर, आसरा चौक, नागेंद्र नगर, कुमठा नाका, कुचन नगर, संगमेश्वर नगर, दाजी पेठ, गवळी वस्ती, लक्ष्मी पेठ -3, मराठा वस्ती, भवानी पेठ, जयमल्हार चौक, बुधवार पेठ, शनिवार पेठ, डुमणेनगर, विनायक नगर, न्यु, पोशम्मा मंदिराजवळ, रविवार पेठ, माणिक चौक, शुक्रवार पेठ, सुनिलनगर, एम.आय.डी.सी., न्यु बुधवार पेठ, लष्कर, सदर बझार, शिवगंगानगर, यश नगर , मुरारजी पेठ, सत्तर फुट रोड , सोलापूर, संगमेश्वर नगर , अक्कलकोट रोड, कुमटा नाका, गर्व्हमेंट क्वार्टर , कुमठा नाका, गांधीनगर, अनंत सोसायटी , जुळे सोलापूर, मौलाली चौक, शोभादेवी नगर, नई जिंदगी, रमांजली चौक, गुडलक हॉटेल, रेल्वेलाईन, गणेश बिल्डर, जुळे सोलापूर, उमेश नगर, हैद्राबाद रोड, हनुमान नगर, न्यु बुधवार पेठ, समाधान नगर, सहयाद्री पार्क, अक्कलकोट रोड, राजीव गांधी नगर, भवानी पेठ, सुभाष नगर, मजरेवाडी, बेगमपेठ, स्वामी विवेकानंद नगर, मजरेवाडी भाग्यलक्ष्मी नगर, लक्ष्मी हौसिंग सोसायटी, कुमठा नाका, जोडभावी पेठ, दत्त चौक, गोल्डफिंज रोड, कर्णिकनगर, म्युनसिपल कॉलनी, रविावार पेठ, मल्लिकार्जुन नगर, कुमठा नाका, नरसिंगगिरजा मिल चाळ, मुरारजी पेठ, किसान संकुल, जवाहर नगर, जुना पुना नाका फेस हाइटस, तेलंगी पाच्छा पेठ, मंत्री चंडकनगर, भवानी पेठ, जेलरोड जवळ, तेलंगी पाच्छा पेठ, गुरुदत्त रेसिडेन्सी, दाजीपेठ, सुदर्शन हनुमाननगर, महादेव नगर, न्यु धोंडीबा वस्ती, रामवाडी, कुमार स्वामी नगर, शेळगी, मुस्लिम पाच्छा पेठ, मंत्री चंडक नगर आणि व्यंकटेश नगर येथे सापडले आहेत.
तसेच मौलाली चौक येथील 80 वर्षाची महिला, रमाबाई आंबेडकर नगर, रामजी चौक येथील 24 वर्षीय युवक, इंदिरा वसाहत, भवानी पेठ परिसातिल 85 वर्षाचा पुरुष आणि न्यु धोंडिबा वस्ती, रामवाडी येथील 70 वर्षाच्या पुरुषाचा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. उर्वरित 594 जणांवर उपचार सुरु आहेत.
Next Article नेपाळचा गोळीबार; भारतीय तरुण ठार
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.